ठाकूरद्वार जंक्शनजवळ रस्ता खचल्यामुळे बस रस्त्यात अडकली; मेट्रो क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात यश


16 Jun 2025
मुंबई,आज सकाळी बॅकबे आगार ते जे. मेहता मार्ग या मार्गावर धावणारी BEST बस क्रमांक 121 (अनुक्रमांक 35, बस क्रमांक MH01 DR-0915), ही सकाळी 8.45 वाजता बॅकबे आगार येथून मार्गस्थ झाली होती. मात्र, ठाकूरद्वार जंक्शन ‘अप’ मार्गावर बाबासाहेब जयकर मार्ग येथे सकाळी 9.25 वाजण्याच्या सुमारास रस्ता खचल्याने सदर बसचा पाठीमागील डावीकडचा टायर खचलेल्या भागात अडकला.
सदर बसमध्ये बसचालक (क्रमांक 011029) व वाहक (क्रमांक 198145) कार्यरत होते. घटनेची माहिती त्वरित टाटा मोटर्सचे अधिकारी श्री. तानाजी आडारकर यांना देण्यात आली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या मेट्रो लाईन-3 प्रकल्पाच्या क्रेन (MH01EN-0039) च्या मदतीने सकाळी 10.45 वाजता बस उचलून सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आली. त्यानंतर 11.00 वाजता बस बॅकबे आगारकडे परत नेण्यात आली.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर जखमी झालेली नाही. बसमध्ये फारसे नुकसान झालेले नसून, ती केवळ रस्त्यातच थांबत होती, मात्र ती हलवण्यायोग्य स्थितीत होती.
सदर घटनेमुळे सकाळी 9.45 वाजल्यापासून BEST बस क्रमांक 121 च्या मार्गात तात्पुरते बदल करण्यात आले.
अप दिशा: कलानिकेतन – उजवे वळण – मेट्रो – डावे वळण – जे. एस. एस. रोड – ठाकूरद्वार जंक्शन (उजवे वळण) – पुढे नियोजित मार्गे
डाऊन दिशा: ठाकूरद्वार जंक्शन – उजवे वळण – जे. एस. एस. रोड – गिरगाव चर्च – डावे वळण – राजाराम मोहन रॉय मार्ग – चारूशिला गुप्ते चौक – डावे वळण – एम. के. रोड – पुढे नियोजित मार्गे
मुंबईत सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पामुळे अनेक रस्त्यांची स्थिती कमकुवत झाली आहे. त्यामुळे अशा दुर्घटना वारंवार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित यंत्रणांनी रस्त्यांच्या मजबुतीसाठी आणि वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.
#Mumbai #BESTBus #BusAccident #RoadSubsidence #Thakurdwar #BackbayDepot #MetroLine3 #TrafficUpdate #PublicTransport #MumbaiNews #BusRouteChange #NoInjury #BusRecovery #TanajiAdarkar #TataMotors #MaharashtraNews #SafeCommute #InfrastructureIssue #UrbanTransport #MetroWorkImpact



