top of page

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यासीनचे उल्लेखनीय यश, चौथीतील गुणवंत विद्यार्थी यासीन मोहम्मद नूर मोहम्मद अन्सारी याने शाळेसह आई-वडिलांचे नाव उज्ज्वल केले

  • Writer: MimTimes मिम टाइम्स  م ٹائمز
    MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
  • 9 minutes ago
  • 1 min read

12 August 2026


मुंबई (मिमटाइम्स): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता चौथीच्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत गोवंडी, मुंबई येथील देवनार कॉलनी म्युनिसिपल इंग्लिश स्कूलचा गुणवंत विद्यार्थी यासीन मोहम्मद नूर मोहम्मद अन्सारी याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.


यासीनने आपल्या मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर हे यश मिळवत शाळेसह आई-वडिलांचे नाव उज्ज्वल केले आहे. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेतील शिक्षक, पालक, नातेवाईक आणि हितचिंतकांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


यासीनच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करताना, त्याने यापुढेही याच मेहनतीने आणि आत्मविश्वासाने शैक्षणिक क्षेत्रात आणखी मोठे यश मिळवावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.



bottom of page