बारामती येथे स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण अभिवादन, जनतेसाठी झटणाऱ्या, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी कायम आग्रही असलेल्या दादांची उणीव कायम जाणवत राहील- अण्णा बनसोडे, उपाध्यक्ष विधानसभा
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز

- 3 days ago
- 1 min read

06 February 2026
मुंबई (मिम टाइम्स)बारामती येथे स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देत कुटुंबीयांशी संवाद साधला.
स्व. अजितदादा पवार यांनी आपल्या संपूर्ण जीवनकाळात जनतेसाठी अखंडपणे कार्य केले. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी घेतलेले निर्णय आणि केलेले कार्य सदैव स्मरणात राहील, असे मत विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केले.
“जनतेसाठी झटणाऱ्या, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी कायम आग्रही असलेल्या दादांची उणीव कायम जाणवत राहील. त्यांचे कार्य आणि विचार पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहेत,” असे उद्गार यावेळी अण्णा बनसोडे यांनी काढले.
या प्रसंगी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कार्याचा गौरव केला.









