top of page

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार गटाने महाराष्ट्र प्रदेशातील अधिकृत प्रवक्त्यांची यादी जाहीर केली

  • Writer: MimTimes मिम टाइम्स  م ٹائمز
    MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
  • Aug 30, 2025
  • 1 min read

30 August 2025


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण खा. शरदचंद्र पवार यांच्या सूचनेनुसार आणि प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व राष्ट्रीय मुख्य प्रवक्ता जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र प्रदेशातील अधिकृत प्रवक्त्यांची यादी जाहीर केली.


या यादीमध्ये विद्याताई चव्हाण, अंकुश काकडे, सुधाकर भालेराव, भिमराव हत्तीअंभिरे, महेश तपासे, विकास लवांदे, सक्षणा सलगर, महेबूब शेख, फहाद अहमद, राज राजापूरकर, मनाली भिलारे, नितीन देशमुख, क्लाईड क्रास्टो, राखीताई जाधव, रचनाताई वैद्य, रविकांत वर्षे, अॅड. हेमाताई पिंपळे, सुनिल माने, शिवराज बांगर पाटील यांच्यासह अमोल मातेले यांचा समावेश करण्यात आला आहे.


प्रदेश प्रवक्ते म्हणून नियुक्ती झाल्यानंतर अमोल मातेले यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की


आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने, पक्षाच्या विचारधारेचा प्रसार आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देत राहीन.



bottom of page