top of page

आज राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोषणेची शक्यता, राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे पत्रकार परिषदेत देतील माहिती

  • Writer: MimTimes मिम टाइम्स  م ٹائمز
    MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
  • Nov 4
  • 1 min read
ree

4 November 2025


मुंबई (मिम टाइम्स) महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून आज दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयुक्त श्री. दिनेश वाघमारे हे सचिवालय जिमखाना, मंत्रालयासमोर, मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.


या पत्रकार परिषदेत राज्यातील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात. त्यानंतर ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका डिसेंबर महिन्यातील हिवाळी अधिवेशनानंतर घेतल्या जाणार आहेत. यासाठी डिसेंबरमध्ये स्वतंत्र निवडणूक कार्यक्रम घोषित केला जाणार आहे.


तर महापालिका निवडणुका जानेवारी २०२६ मध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


राज्य निवडणूक आयोगाने प्रत्येक निवडणूक प्रक्रिया २१ दिवसांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. या कालावधीत नामांकन दाखल करणे, प्रचार, मतदान आणि मतमोजणीचा समावेश असेल. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत २१ दिवसांचे वेळापत्रक आणि आचारसंहितेची घोषणा होण्याची शक्यता आहे.


राज्यातील नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकांचा कार्यक्रम आज संध्याकाळी जाहीर झाल्यानंतर, राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची आणि स्थानिक पातळीवरील हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.











bottom of page