एसटी महामंडळ प्रथमच १६ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपयाने नफ्यात...!*३१ पैकी २० विभागांनी ऑगस्ट महिन्यात कमावला नफा...
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز

- Sep 12, 2024
- 1 min read

एसटी महामंडळाने ऑगस्ट २०२४ मध्ये १६ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपयांचा नफा कमावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. गेल्या ९ वर्षांनंतर महामंडळ पहिल्यांदाच नफ्यात आले असून, ३१ विभागांपैकी २० विभागांनी नफा मिळवला आहे. यामध्ये राज्य शासनाच्या ७५ वर्षांवरील ज्येष्ठांसाठी मोफत प्रवास योजना आणि महिलांसाठी ५०% सवलत या योजनांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. तसेच, एसटी प्रशासनाच्या विविध उपक्रमांमुळे प्रवाशांची संख्या वाढली असून, बस सेवेत सुधारणा करण्यात आली आहे. महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी यशस्वी कामगिरीसाठी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.









