खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचा अनेक कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत; कोकणात पक्षाला बळ मिळणार
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز

- Oct 14
- 1 min read

14 October 2025
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह मंगळवारी भारतीय जनता पार्टीत (भाजप) प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी श्री. खेडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला प्रचंड यश मिळवून देण्याचा विश्वास यावेळी खेडेकर यांनी व्यक्त केला.
या पक्षप्रवेश सोहळ्यात रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, माजी आ. विनय नातू, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, केदार साठे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. चव्हाण म्हणाले की, विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्रासाठी समर्पित मोदी सरकार आणि महायुती सरकार जोमाने काम करत आहे. दोन आश्वासक नेतृत्वावर विश्वास ठेवत सर्वसमावेशक विकासासाठी एक धडाडीचा कार्यकर्ता आणि मित्रत्व जपणारे वैभव खेडेकर यांचा भाजपा प्रवेश ही आनंदाची बाब आहे. त्यांच्या प्रवेशामुळे कोकणात भाजपाला बळ मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
पक्षप्रवेशावेळी वैभव खेडेकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीवर विश्वास असल्याने परिसर विकासासाठी भाजपामध्ये प्रवेश करत आहे. भाजपा संघटना वाढीसाठी झोकून देऊन काम करेन. जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या साथीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
वैभव खेडेकर यांच्याबरोबर भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये सुबोध जाधव, संतोष नलावडे, सुरेश सावंत, विलास जाधव, मनीष खवळे, मिलिंद नांदगांवकर, संजय आखाडे, रहीम सहीबोले आदींचा समावेश आहे.









