top of page

चेंबूरच्या सिद्धार्थनगरमधील आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुर्घटना स्थळाची पाहणी; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

  • Writer: MimTimes मिम टाइम्स  م ٹائمز
    MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
  • Oct 6, 2024
  • 1 min read

मुंबई, दि. ६: चेंबूर येथील सिद्धार्थनगर परिसरात झालेल्या आग दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तसेच, या दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर शासनाच्या वतीने मोफत उपचार केले जातील.

मुख्यमंत्री शिंदे यांनी आज दुर्घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांची आस्थेने विचारपूस केली आणि त्यांना सर्वतोपरी मदत मिळेल, याची हमी दिली. यावेळी त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना धीर देत शासन त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले.

दुर्घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार असून, यापुढे अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी योग्य ती काळजी घेतली जाईल." तसेच, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे काम रखडले असल्यास त्यावरही विचार करून निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, माजी खासदार राहुल शेवाळे, तसेच मुंबई महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 
 
bottom of page