डॉ. अमोल आंबेकर यांची शिवसेना डॉक्टर सेल महाराष्ट्र प्रदेश संघटक आणि विस्तारक पदावर नियुक्ती
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
- Jul 31
- 1 min read

31 July 2025
मुंबई, नामवंत वैद्यकीय सेवक आणि समाजसेवक डॉ. अमोल महादेवराव आंबेकर (BAMS, PGDMLS) यांची शिवसेना डॉक्टर सेल – महाराष्ट्र प्रदेश संघटक व विस्तारक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार,शिवसेना डॉक्टर असेल प्रदेश प्रमुख, महाराष्ट्र राज्य डॉ धनंजय पडवळ यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आली आहे.
डॉ. आंबेकर हे Ambekar’s Diagnosis Centre, Doctor’s House Satyamol Hospital, Shree Swami Samarth Medical (Shivaji नगर) तसेच Maa Hospital & ICU, Trombay आणि Miracle Clinic, Chembur या संस्थांचे संचालक आहेत. तसेच, ESIC पॅनेल डॉक्टर, Satyamol Foundation आणि Maharashtra Registered Doctors Association चे अध्यक्ष म्हणूनही ते सक्रिय कार्यरत आहेत.
नियुक्तीनंतर बोलताना डॉ. आंबेकर म्हणाले, "वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण, तसेच मा. एकनाथ शिंदे साहेब व डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या लोकहितकारी कार्यातून प्रेरणा घेत मी वैद्यकीय क्षेत्रात शिवसेनेच्या माध्यमातून जनतेसाठी काम करणार आहे."
ते पुढे म्हणाले, "सर्वसामान्य रुग्णांचे तसेच डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ आणि फार्मासिस्ट यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी हे व्यासपीठ उपयोगी ठरेल. इच्छुकांनी नियुक्तीसाठी 9773459206 या क्रमांकावर संपर्क साधावा."
या नव्या जबाबदारीबद्दल राज्यभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.