दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, अरविंद केजरीवाल व मनिष सिसोदिया पराभूत
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز

- Feb 8
- 1 min read

8 February 2025
दिल्ली: आजदिल्ली विधानसभेच्या निकालांमध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजपा) विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आम आदमी पक्षाला (आप) केवळ २२ जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निकालांनी दिल्लीच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे.
विशेष म्हणजे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचा पराभव झाला आहे. अरविंद केजरीवाल यांना नवी दिल्ली मतदारसंघातून भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांनी पराभूत केले आहे. तर मनिष सिसोदिया यांना जंगपूरा मतदारसंघातून तरविंदर सिंग मारवाह यांनी पराभूत केले आहे.
अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया
“दिल्लीच्या जनतेचा कौल आम्ही नम्रतेने स्वीकारतो. विजयासाठी भारतीय जनता पक्षाचे अभिनंदन. आम्ही आता विरोधी पक्षाची भूमिका पार पाडू आणि लोकांची सेवा करत राहू. राजकारण फक्त सत्तेसाठी नाही, तर लोकांमध्ये राहून त्यांच्या समस्या सोडवण्याचा आमचा हेतू आहे,” अशी प्रतिक्रिया अरविंद केजरीवाल यांनी दिली.
See video
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत दिल्लीकरांचे आभार मानले. “जनशक्ती सर्वोपरी आहे. आम्ही दिलेल्या आश्वासनांवर नक्कीच काम करू आणि दिल्लीचा चौफेर विकास करू,” असे मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
भाजपाचा विजय का महत्त्वाचा?
दिल्लीमध्ये भाजपाला मोठा विजय मिळाल्याने आपच्या नेतृत्वाखालील सरकारचे सत्ताबदल स्पष्ट झाले आहे. भाजपने विकास आणि सुशासनाचे मुद्दे पुढे करत हा विजय मिळवला आहे.
दिल्लीच्या राजकारणाला आकार देणाऱ्या या निकालांचे पुढील परिणाम भविष्यात पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.









