top of page

भारतीय जनता पार्टी-महाराष्ट्रकडून संघटनात्मक नियुक्त्या

  • Writer: MimTimes मिम टाइम्स  م ٹائمز
    MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
  • Sep 5
  • 1 min read
ree

5 September 2025


मुंबई : आगामी विधान परिषद निवडणुकीत पदवीधर विभागासाठी भारतीय जनता पार्टी-महाराष्ट्रने विभागनिहाय ‘मतदार नोंदणी प्रमुख’ म्हणून पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.


नियुक्तींचा तपशील पुढीलप्रमाणे —


• छत्रपती संभाजीनगर विभाग : श्री. संजय किशनराव केनेकर – प्रदेश सरचिटणीस व विधान परिषद सदस्य


• नागपूर विभाग : श्री. सुधाकर विठ्ठलराव कोहळे – प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य


• पुणे विभाग : श्री. राजेश बाबुलाल पांडे – प्रदेश सरचिटणीस


प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांनी या नियुक्त्या जाहीर करताना सांगितले की, “पदवीधर विभागातील उमेदवार जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी व्हावेत यासाठी पक्ष संघटन कार्यकर्त्यांनी एकदिलाने प्रयत्न करावेत.”


या नियुक्त्यांमुळे आगामी विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या संघटनात्मक ताकदीला अधिक बळ मिळणार असल्याचे पाहिले जात आहे.


bottom of page