top of page

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतले गणरायाचे दर्शन

  • Writer: MimTimes मिम टाइम्स  م ٹائمز
    MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
  • Sep 9, 2024
  • 1 min read

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतले गणरायाचे दर्शन
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतले गणरायाचे दर्शन

मुंबई, दि. ९: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी गणपतीची पूजा केली. मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्र्यांचे स्वागत केले आणि गणपतीच्या आरतीमध्ये सहभागी झाले.

या प्रसंगी, मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गृहमंत्र्यांना शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच, त्यांना 'शासन आपल्या दारी' पुस्तकाची प्रत आणि गणपतीची मूर्ती भेट देण्यात आली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्नुषा वृषाली शिंदे यांनी गृहमंत्र्यांचे औक्षण करीत स्वागत केले.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दीपक केसरकर, मंगल प्रभात लोढा, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर उपस्थित होते. गृहमंत्री शाह यांनी मुख्यमंत्री शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि स्नुषा वृषाली यांच्याशी संवाद साधला.

bottom of page