top of page

राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री आणि सहपालकमंत्री जाहीर

18 January 2025


मुंबई,महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी पालकमंत्री व सहपालकमंत्री नियुक्त केले आहेत. या नियुक्त्या सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केल्या आहेत. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद, तर सहपालकमंत्रीपद ॲड. आशिष जयस्वाल यांना देण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाणे या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद आहे, तर अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीड जिल्ह्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.


इतर जिल्ह्यांचे पालकमंत्री व सहपालकमंत्री पुढीलप्रमाणे :


• नागपूर व अमरावती: चंद्रशेखर बावनकुळे


• अहिल्यानगर: राधाकृष्ण विखे-पाटील


• वाशीम: हसन मुश्रीफ


• सांगली: चंद्रकांत पाटील


• नाशिक: गिरीश महाजन


• पालघर: गणेश नाईक


• जळगाव: गुलाबराव पाटील


• यवतमाळ: संजय राठोड


• मुंबई उपनगर: ॲड. आशिष शेलार (सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा)


• रत्नागिरी: उदय सामंत


• धुळे: जयकुमार रावल


• जालना: श्रीमती पंकजा मुंडे


• नांदेड: अतुल सावे


• चंद्रपूर: डॉ. अशोक उईके


• सातारा: शंभूराज देसाई


• रायगड: कु. आदिती तटकरे


• लातूर: शिवेंद्रसिंह भोसले


• नंदुरबार: ॲड. माणिकराव कोकाटे


• सोलापूर: जयकुमार गोरे


• हिंगोली: नरहरी झिरवाळ


• भंडारा: संजय सावकारे


• छत्रपती संभाजीनगर: संजय शिरसाट


• धाराशिव: प्रताप सरनाईक


• बुलढाणा: मकरंद जाधव (पाटील)


• सिंधुदुर्ग: नितेश राणे


• अकोला: आकाश फुंडकर


• गोंदिया: बाबासाहेब पाटील


• कोल्हापूर: प्रकाश आबिटकर (सहपालकमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ)


• वर्धा: डॉ. पंकज भोयर


• परभणी: श्रीमती मेघना बोर्डीकर


ही नियुक्ती प्रशासनाच्या कामकाजात गती आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सरकारने प्रत्येक जिल्ह्याला सक्षम नेतृत्व देण्याचा प्रयत्न केला आहे.


bottom of page