राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) ने जाहीर केले नवीन प्रदेश प्रवक्ते
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز

- Oct 1
- 1 min read

01 October 2025
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज अधिकृतपणे पक्षाचे नवे प्रवक्ते जाहीर केले आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांनी प्रसारमाध्यमांना पाठविलेल्या पत्रकात या नियुक्त्यांची माहिती देण्यात आली.
पक्षाकडून प्रसारमाध्यमांमध्ये (प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडिया) अधिकृत भूमिका मांडण्यासाठी खालील नेत्यांची प्रदेश प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे –
१) डॉ. हेमलता निनाद पाटील
२) सौ. राजलक्ष्मी भोसले
३) सौ. प्रतिभाताई शिंदे
४) श्री. राजीव साबळे
५) श्री. विकास पासलकर
पक्षाने स्पष्ट केले आहे की, वरील प्रवक्त्यांना कोणत्याही विषयासाठी चर्चा अथवा पक्षाची भूमिका मांडण्यासाठी आमंत्रित करावयाचे असल्यास मुख्य प्रवक्ते श्री. आनंद परांजपे किंवा प्रदेश प्रवक्ते श्री. संजय तटकरे यांच्याशी संपर्क साधावा.
या नव्या नियुक्त्यांमुळे पक्षाच्या प्रवक्त्यांची टीम आणखी मजबूत झाली असल्याचे पक्षनेते सांगत आहेत.









