शायना एन. सी. यांची शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती!


4 August 2025
मुंबई ,वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत, शिवसेनेच्या वतीने एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या नियुक्ती पत्रानुसार, श्रीमती शायना एन. सी. यांची राष्ट्रीय प्रवक्तेपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे.
ही नियुक्ती शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार करण्यात आली असून, याचा कालावधी एक वर्षाचा असेल.
नियुक्ती पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे की, शायना एन. सी. या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा सक्रिय प्रचार-प्रसार करतील, तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक वाढीसाठी एकजूट करून कार्य करतील, असा पक्षाला विश्वास आहे.
शिवसेना सचिव संजय मोरे यांनी शुभेच्छा देत सांगितले की, पक्षाच्या ध्येय-धोरणांची ठामपणे मांडणी करण्यासाठी शायना एन. सी. यांची भूमिका महत्त्वाची ठरेल.



