श्री. कालिदास कोळंबकर यांनी घेतली हंगामी अध्यक्ष पदाची शपथ! राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची विशेष उपस्थिती
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز

- Dec 6, 2024
- 1 min read

मुंबई: भाजपाचे ज्येष्ठ आमदार श्री. कालिदास कोळंबकर यांची दुसऱ्यांदा विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. आज (शुक्रवार, ६ डिसेंबर २०२४) राजभवन येथे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते त्यांना हंगामी अध्यक्षपदाची शपथ दिली. त्यामुळे, विधिमंडळाच्या विशेष अधिवेशन काळात त्यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभेचे कार्यवाही होणार आहे.
शपथविधी दरम्यान श्री. कालिदास कोळंबकर म्हणाले, "मी कालिदास कोळंबकर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी शपथ घेतो की..." यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही श्री. कालिदास कोळंबकर यांचे अभिनंदन केले. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, विधानमंडळ सचिव-१ श्री. जितेंद्र भोळे, सचिव-२ श्री. विलास आठवले यांचीही उपस्थिती होती.
राज्यपाल आणि अन्य प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रगीताने झाली, तर समाप्तीही राष्ट्रगीताने झाली.
विधानसभेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन शनिवार ७ डिसेंबर २०२४ पासून बोलवण्यात आले आहे. यामध्ये नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडणार आहे. विधानमंडळ सचिवालयाकडून या विशेष अधिवेशनासाठी महत्त्वाच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
Watch Full video :- https://youtu.be/h8irW_Ktul0









