संजय राऊत यांच्या टीकेला शिवसेना प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे यांचे जोरदार प्रत्युत्तर
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز

- Feb 12, 2025
- 1 min read

12 February 2025
मुंबई , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे पुरस्कार मिळाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला शिवसेना प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे यांनी तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
प्रा. वाघमारे म्हणाल्या, "एकनाथ शिंदे साहेबांना महादजी शिंदे पुरस्कार मिळाल्यावर संजय राऊत यांची मळमळ वाढली आहे. त्यामुळे प्रश्न पडतो की हा नक्की संज्या राऊत आहे की गांजा राऊत? पानिपतच्या पराभवाच्या जखमा पुसणाऱ्या द ग्रेट मराठा महादजी शिंदे यांचा अपमान करण्याची मस्ती त्यांना आली कुठून?"
त्यांनी पुढे संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, "काही दिवसांपूर्वी ज्या पवार साहेबांचे तुम्ही बूट चाटत होतात, त्यांनाच आता तुम्ही शिकवणार? मराठी साहित्यिकांना दलाल म्हणण्याचा माज तुम्हाला येतो कुठून? जर आचार्य अत्रे आज असते, तर संजय राऊत यांची जोड्याने पूजा केली असती!"
प्रा. वाघमारे यांच्या या प्रतिक्रियेमुळे शिवसेनेत जोरदार राजकीय वातावरण तापले असून, संजय राऊत यांच्या पुढील उत्तराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
See video









