top of page

समाज भूषण' राज्यस्तरीय पुरस्कारासाठी राजूभाई झनके यांची निवड, १५ जून रोजी नांदेडमध्ये होणार गौरव समारंभ

  • Writer: MimTimes मिम टाइम्स  م ٹائمز
    MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
  • Jun 8
  • 1 min read
ree

8 Jun 2025


नांदेड,प्रज्ञा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नांदेड व महाराष्ट्र भास्कर व्यायामशाळा व क्रीडा मंडळ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा प्रतिष्ठेचा "समाज भूषण 2025" राज्यस्तरीय पुरस्कार यंदा मुंबईचे मा. राजूभाई झनके यांना जाहीर झाला आहे.

या पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून ५०० हून अधिक नामांकन प्रस्ताव प्राप्त झाले होते. विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची शहानिशा करून झनके यांची निवड करण्यात आली आहे. समाजसेवा, जनकल्याण व सामाजिक परिवर्तनासाठी त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

हा राज्यस्तरीय गौरव सोहळा १५ जून रोजी

संत ज्ञानेश्वर महाराज मंगल कार्यालय,

या ठिकाणी पार पडणार असून, या कार्यक्रमास राज्यातील मान्यवर साहित्यिक, सामाजिक नेते, वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

पुरस्कारप्राप्त राजूभाई झनके यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या कुटुंबीय व मित्रमंडळींनी या गौरव सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



bottom of page