अंगणवाडी सेविकांची राहुल गांधींसोबत महत्त्वपूर्ण बैठक
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز

- Feb 11
- 1 min read

11 February 2025
दिल्ली ,अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळाने आज लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या चर्चेदरम्यान सेविकांनी त्यांच्या मागण्या व समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली.
या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले आणि प्रदेश कार्याध्यक्ष खासदार प्रणिती शिंदे उपस्थित होते. अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या मानधन वाढ, सेवा शर्तींच्या सुधारणा तसेच सेवांच्या स्थिरतेसाठी सरकारकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली.
राहुल गांधी यांनी सेविकांच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्या आणि त्यावर योग्य तो मार्ग काढण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.
या बैठकीमुळे अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांना नवा पाठिंबा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
See video









