top of page

अण्णा बनसोडे यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे, विधानभवनात विशेष बैठक घेऊन उपोषणकर्त्यांना न्याय मिळवून देणार

  • Writer: MimTimes मिम टाइम्स  م ٹائمز
    MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
  • 57 minutes ago
  • 1 min read
ree

30 October 2025


मुंबई (मिम टाइम्स) विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या आश्वासनानंतर नाशिकमधील अंबड व सातपूर एमआयडीसी परिसरातील १३० कंपन्यांनी केलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणांविरोधात सुरू असलेले आमरण उपोषण मागे घेण्यात आले आहे.


संतोष शर्मा आणि त्यांच्या परिवाराने सातपूर एमआयडीसी कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले होते. त्यांची मुख्य मागणी होती की सातपूर आणि अंबड एमआयडीसीमधील वाढलेली अतिक्रमणे त्वरित हटवावीत, तसेच अतिक्रमण वाढीस प्रोत्साहन देणारे कार्यकारी अभियंता जयवंत पवार आणि दोन्ही विभागांचे उपअभियंते यांना तात्काळ बडतर्फ करण्याचे आदेश द्यावेत.


अतिक्रमणाविरोधात संतोष शर्मा यांनी वेळोवेळी विधानभवन, जिल्हाधिकारी कार्यालय आणि एमआयडीसी कार्यालयासमोर आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांवर लिखित चौकशी व्हावी, अशीही त्यांची मागणी होती.


मागील विधानसभेतही या १३० अतिक्रमणांविरोधात काही आमदारांनी प्रश्न उपस्थित केला होता. पण एक महिना उलटूनही कारवाई न झाल्याने शर्मा परिवाराने आमरण उपोषण सुरू केले होते.

See video

या पार्श्वभूमीवर विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉलद्वारे संतोष शर्मा आणि त्यांच्या परिवाराशी संवाद साधला. नाशिकमधील अंबड आणि सातपूर एमआयडीसी क्षेत्रातील बेकायदेशीर अतिक्रमणांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी विधानभवनात बैठक बोलावण्याचे त्यांनी आश्वासन दिले.


या आश्वासनावर समाधान व्यक्त करत संतोष शर्मा आणि त्यांच्या परिवाराने आमरण उपोषण मागे घेतले आहे.


bottom of page