top of page

एल. एस. रहेजा स्कूल ऑफ आर्टच्या कलावंतांची भव्य एकत्रित प्रदर्शनी — 'सृजन मान्सून शो' नेहरू आर्ट गॅलरीत उद्घाटित

  • Writer: MimTimes मिम टाइम्स  م ٹائمز
    MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
  • Jul 30, 2025
  • 1 min read

30 July 2025


सचिन व्ही.



मुंबई: विश्वविख्यात कॅलिग्राफर पद्मश्री अच्युत पालव यांच्या शुभ हस्ते 'सृजन मान्सून शो' चा उद्घाटन सोहळा मंगळवारी वरळीच्या नेहरू आर्ट गॅलरीत पार पडला.

विशेष म्हणजे, पहिल्यांदा वांद्रे येथील एल. एस. रहेजा स्कूल ऑफ आर्टच्या आजी माजी प्राध्यापक विद्यार्थ्यांनी एकत्र येत हा 'सृजन मान्सून शो' आयोजित केला आहे.

'सृजन मान्सून शो' अंतर्गत एकूण 23 नामांकित चित्र-शिल्पकारांच्या आणि प्रथितयश अध्यापकांच्या जलरंग, तैलरंग, ऍक्रॅलिक, मिक्स मीडिया टेराकोटा पेपर आर्ट अश्या वैविध्यपूर्ण माध्यमांतील सुमारे 150 कलाकृतींचा आस्वाद कलारसिकांना घेता येईल.


वरळीच्या नेहरू आर्ट गॅलरीतील वातानुकूलित आणि सर्क्युलर अश्या दोन्ही कला-दालनात 4 ऑगस्टपर्यंत 'सृजन मान्सून शो' कलारसिकांना पाहता येईल.

"कोणी १९९० या वर्षातील प्राध्यापक तर कोणी प्राचार्य तर काही २००० या वर्षातील रहेजाचे विद्यार्थी आज 'सृजन मान्सून शो' निमित्त एकत्र आलो आहोत. ही आमच्यासाठी एक पर्वणी म्हणावी लागेल. कित्येक वर्षांनी आम्ही एकत्र आल्याने फार आनंद होत आहे आणि प्रत्येकाचे काम पाहण्याची संधी सोबत जुन्या आठवणींना उजाळा ही 'सृजन मान्सून शो' निमित्त मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया एल. एस. रहेजा स्कूल ऑफ आर्टच्या आजी माजी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.


एल. एस. रहेजा स्कूल ऑफ आर्टच्या आजी माजी प्राध्यापक विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचे उद्देशाने 'सृजन मान्सून शो' ची संकल्पना ही दीपक पाटील यांनी मागील वर्षी मांडली होती. ही संकल्पना यंदा प्रत्यक्षात साकारली देखील गेली, याचा प्रत्येकाला आनंद होत आहे.










bottom of page