दावोस 2025: महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक दिवस, 4.99 लाख कोटींच्या सामंजस्य करार
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
- Jan 21
- 1 min read

21 January 2025
दावोस,वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या उद्घाटनानंतर पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक 4,99,321 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करून विक्रम केला. या गुंतवणुकीतून 92,235 रोजगार निर्माण होणार असल्याचे सांगण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “महाराष्ट्र हे उद्योगांसाठी सर्वात आकर्षक राज्य असून ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ची प्रक्रिया जलद व सुलभ आहे. हे सामंजस्य करार महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट देणारे ठरतील.”
• जेएसडब्ल्यू समूह:
• गुंतवणूक: ₹3,00,000 कोटी
• रोजगार: 10,000
• क्षेत्र: स्टील, नवीकरणीय ऊर्जा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज
• स्थान: नागपूर/गडचिरोली
• कल्याणी समूह:
• गुंतवणूक: ₹5,200 कोटी
• रोजगार: 4,000
• क्षेत्र: संरक्षण, स्टील, ईव्ही
• स्थान: गडचिरोली
• रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर:
• गुंतवणूक: ₹16,500 कोटी
• रोजगार: 2,450
• क्षेत्र: संरक्षण
• स्थान: रत्नागिरी
• वारी एनर्जी:
• गुंतवणूक: ₹30,000 कोटी
• रोजगार: 7,500
• क्षेत्र: हरित ऊर्जा
• स्थान: नागपूर
• ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी:
• गुंतवणूक: ₹25,000 कोटी
• रोजगार: 1,500
• क्षेत्र: डेटा सेंटर्स
• स्थान: एमएमआर
दावोसमधील पहिला करार राज्यातील पहिल्या जिल्हा गडचिरोलीसाठी झाला. कल्याणी समूहाने येथे ₹5,200 कोटींची गुंतवणूक करत 4,000 रोजगार निर्मितीचे आश्वासन दिले आहे.
पुण्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल मार्केटिंग आणि बिझनेस अॅनालिटिक्ससारख्या कौशल्यांवर प्रशिक्षण देण्यासाठी फ्युएलने युनिव्हर्सिटी स्थापन करण्याची घोषणा केली.
जेएसडब्ल्यू समूहाचे सज्जन जिंदाल म्हणाले, “महाराष्ट्रात एकदा गुंतवणूकदार आला की, तो इथून बाहेर जात नाही. येथे गुंतवणुकीचा सकारात्मक वातावरण आहे.”
आजपर्यंतच्या करारांची एकूण रक्कम ₹4,99,321 कोटी असून या गुंतवणुकीमुळे राज्याच्या पायाभूत सुविधांपासून हरित ऊर्जेपर्यंत विविध क्षेत्रांमध्ये भरीव विकास होणार आहे.