top of page

"नशा खुबे"ला मराठी जनतेचा चपलेचा प्रसाद! मराठी अस्मितेच्या अपमानावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जोडे मारो आंदोलन

  • Writer: MimTimes मिम टाइम्स  م ٹائمز
    MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
  • Jul 8
  • 1 min read
ree

8 July 2025


मुंबई, झारखंडचे भाजप खासदार निशिकांत दुबे (ज्यांना संतप्त मराठी जनतेने "नशा खुबे" अशी उपमा दिली आहे) यांच्या मराठी विरोधी वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ आज घाटकोपर (पश्चिम) येथील वेलकम हॉटेलजवळ राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) तर्फे जोरदार "जोडे मारो आंदोलन" करण्यात आले.


या आंदोलनाचे नेतृत्व मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी केले. आंदोलनादरम्यान निशिकांत दुबे यांच्या फोटोला जोडे मारत मराठी अस्मितेचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा देण्यात आला.

आमच्या पैशांवर मराठी लोक खातात, अशी खालच्या पातळीची विधाने करणे, हे मराठी जनतेचा अपमान असून त्याचा यथोचित समाचार घेण्याची वेळ आली असल्याचे ॲड. मातेले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यांनी पुढे म्हटले:


“हा केवळ एका खासदाराचा अपमानजनक शब्दप्रयोग नाही, तर मराठी माणसाच्या अस्मितेवर केलेला घाव आहे. भाजपचे हे खरे स्वरूप जनतेसमोर उघडे पाडण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत.”


आंदोलन स्थळी "मराठीचा अपमान सहन करणार नाही", "नशा खुबे, महाराष्ट्र सोड", "भेसळ जनता पार्टी हाय हाय" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. अनेक युवकांनी हातात चपला घेऊन निशिकांत दुबे यांच्या प्रतिमेला फटकारले.


पोलीस बंदोबस्तात आंदोलन शांततेत पार पडले, मात्र जनतेचा संताप ओसंडून वाहत होता. महाराष्ट्रात मराठी-अमराठी वाद पुन्हा एकदा पेटला असून, भाजप खासदाराच्या विधाने या आगीवर तेल ओतण्याचे काम करत आहेत.


राजकीय विश्लेषकांच्या मते, जर भाजपने अशा खासदारांवर वेळीच अंकुश ठेवला नाही, तर महाराष्ट्रात त्याचा गंभीर राजकीय फटका बसू शकतो.












bottom of page