महाराष्ट्र सरकारने इतर मागासवर्गीय कल्याणासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत केली
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
- Sep 3
- 1 min read

3 September 2025
मुंबई,महाराष्ट्र शासनाने इतर मागासवर्गीय समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत तसेच इतर संबंधित बाबींवरील कार्यवाहीसाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२५/प्र.क्र.१५७/मावक मंत्रालयानुसार, ही उपसमिती इतर मागासवर्गीय समाजाच्या कल्याणासाठी राज्य शासनाच्या विविध योजनांचे परिक्षण, उपाययोजना सुचवणे आणि अंमलबजावणीचे नियंत्रण करण्यासाठी काम करेल.
उपसमितीचे सदस्य आणि पद
• अध्यक्ष: श्री. चंद्रशेखर बावनकुळे, मा. मंत्री, महसूल
• सदस्य: श्री. छगन भुजबळ, मा. मंत्री, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
• सदस्य: श्री. गणेश नाईक, मा. मंत्री, वने
• सदस्य: श्री. गुलाबराव पाटील, मा. मंत्री, पाणीपुरवठा व स्वच्छता
• सदस्य: श्री. संजय राठोड, मा. मंत्री, मृदा व जलसंधारण
• सदस्य: श्रीमती पंकजा मुंडे, मा. मंत्री, पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन
• सदस्य: श्री. अतुल सावे, मा. मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक उर्जा व दिव्यांग कल्याण
• सदस्य: श्री. दत्तात्रय भरणे, मा. मंत्री, कृषी
• सचिव, उपसमिती: इतर मागास बहुजन कल्याण विभाग

उपसमितीच्या कार्यकक्षेत समाविष्ट:
• इतर मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी राज्य शासनाच्या योजनांचे मूल्यांकन आणि सुधारणा सुचवणे.
• महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाद्वारे राबविण्यात येणा-या योजनांचा आढावा घेणे व नियंत्रण ठेवणे.
• सार्वजनिक क्षेत्रातील नेमणुका व सेवांमध्ये इतर मागासवर्गीयांना योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व सुनिश्चित करणे.
• आरक्षणविषयक प्रशासकीय व वैधानिक कामकाजाचा समन्वय राखणे.
• न्यायालयीन प्रकरणांमधील शासनाच्या वतीने बाजू मांडण्यासाठी समुपदेशकांशी समन्वय करणे.
• आंदोलक व शिष्टमंडळाशी चर्चा करणे व आवश्यक त्या सूचना देणे.
सदर उपसमितीला आवश्यकतेनुसार तज्ञ, विधिज्ञ व संबंधित अधिकाऱ्यांना विचारविनिमयासाठी आमंत्रित करण्याचा अधिकार देखील आहे.