top of page

अकोला व यवतमाळ येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालये तात्काळ सुरू करा, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे प्रशासनाला निर्देश

  • Writer: MimTimes मिम टाइम्स  م ٹائمز
    MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
  • Nov 20, 2025
  • 1 min read

20 November 2025


मुंबई (मिम टाइम्स): वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागांतर्गत अकोला आणि यवतमाळ येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालये खाजगी भागीदारी (PPP) तत्वावर तातडीने सुरू करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागांतर्गत लातूर, अकोला, छत्रपती संभाजीनगर आणि यवतमाळ येथील चार सुपर स्पेशालिटी रुग्णालयांना खाजगी भागीदारी धोरणानुसार सुरू करण्याबाबत विधानभवनात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमार, वैद्यकीय शिक्षण व आयुष विभागाचे आयुक्त अनिल भंडारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.


उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयासंदर्भातील याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. तसेच लातूर येथील प्रक्रिया देखील तत्सम असल्याने तिथेही न्यायालयीन स्थगिती येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अकोला व यवतमाळ येथील रुग्णालये विलंब न करता सुरू करावीत.


यासोबतच छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांमार्फत उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठातील प्रलंबित याचिकेचा पाठपुरावा करून संबंधित कार्यवाहीचा अहवाल तातडीने शासनास सादर करण्याच्या सूचनाही उपाध्यक्ष बनसोडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.



bottom of page