top of page

क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना ठाणे जिल्ह्यात सक्रिय ठाणे जिल्हा कार्यकारिणी जाहीर – प्रमोद वाघमोडे अध्यक्ष, महिला आघाडी आयेशा वाडकर

  • Writer: MimTimes मिम टाइम्स  م ٹائمز
    MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
  • Mar 11
  • 2 min read
ree

11 March 2025


ठाणे, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या ठाणे जिल्हा शाखेची बैठक कल्याण पश्चिमेतील आप्पासाहेब शिंदे यांच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत संघटनेच्या विस्ताराबरोबरच क्रीडा शिक्षकांच्या समस्या, शालेय क्रीडा स्पर्धांतील सहभाग आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या अतिरिक्त गुणांविषयी चर्चा करण्यात आली.


या बैठकीला महासंघाचे राज्य अध्यक्ष शरदचंद्र धारुरकर, राज्य पदाधिकारी मिलींद क्षीरसागर, राजेंद्र पितळिया यांची विशेष उपस्थिती होती. जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर, नवी मुंबई महानगरपालिका तसेच सर्व तालुक्यांतील क्रीडा शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.


शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून मिळणाऱ्या सवलतीच्या गुणांसाठी ऑनलाईन अर्ज भरावा लागतो. मात्र, या प्रक्रियेत क्रीडा शिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. महासंघाने या समस्यांबाबत आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष यांना निवेदन दिले. महासंघाच्या प्रयत्नांमुळे अर्ज प्रक्रियेत सुधारणा करण्याचे आणि शुल्क भरणा प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्याचे मंडळाने खात्रीलायक आश्वासन दिले असल्याचे शरदचंद्र धारुरकर यांनी उपस्थित क्रीडा शिक्षकांना सांगितले.


ठाणे जिल्हा कार्यकारिणी जाहीर


ठाणे जिल्ह्यात ६ महानगरपालिका व ८ तालुके असल्याने प्रत्येक विभागातून प्रतिनिधींची निवड करण्यात आली.


नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:


• अध्यक्ष – प्रमोद वाघमोडे (ठाणे महानगरपालिका)


• कार्याध्यक्ष – ऐश्वर्या मदाने (कल्याण ग्रामीण)


• उपाध्यक्ष – विशाखा आर्डेकर (ठाणे महानगरपालिका), अनंत उतेकर (कल्याण डोंबिवली महानगरपालिका),


•  महेश बडेकर (उल्हासनगर महानगरपालिका),


• जयराम गोंधळी (मुरबाड तालुका)


• कोषाध्यक्ष – दौलत चव्हाण (शहापूर तालुका)


• सचिव – गणेश मोरे (कल्याण डोंबिवली महानगरपालिका)


• कार्यालयीन सचिव – राजेंद्र पवार (ठाणे महानगरपालिका)


• संघटक – पांडुरंग ठोंबरे (ठाणे महानगरपालिका)


• महिला आघाडी  – आयेशा वाडकर (ठाणे महानगरपालिका)


• महिला आघाडी  – रोहिणी डोंबे (ठाणे महानगरपालिका),


• वृषाली मत्रे (ठाणे ग्रामीण),


• सिद्धी साळवी (कल्याण डोंबिवली महानगरपालिका),


• सावित्री मोहिते (ठाणे महानगरपालिका)


महिलांसाठी स्वतंत्र युनिट

या बैठकीत महिला क्रीडा शिक्षकांचा मोठा सहभाग दिसून आला. ठाणे जिल्हा स्तरावर केवळ महिलांसाठी स्वतंत्र युनिट निर्माण करण्याचा निर्धार सर्व उपस्थित महिलांनी केला.

ठाणे जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे मध्यवर्ती कार्यालय ठाणे शहरात असेल, अशी घोषणा महासंघाचे राज्य अध्यक्ष शरदचंद्र धारुरकर यांनी केली.

bottom of page