डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या काळात रेल्वे कोच वाढवावेत मुंबईत येणाऱ्या अनुयायांचा प्रवास होईल सुकर विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची रेल्वे मंत्र्यांना पत्राद्वारे विनंती
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز

- Nov 5
- 1 min read

5 November 2025
मुंबई (मिम टाइम्स)भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखो अनुयायी दादर येथे येतात. मात्र, दरवर्षी या काळात रेल्वे प्रवासात अनुयायांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर अनुयायांच्या प्रवासाची गैरसोय टाळण्यासाठी ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाच्या पाच दिवस आधी मुंबईकडे येणाऱ्या आणि ६ डिसेंबरनंतर पाच दिवसांनी मुंबईहून निघणाऱ्या रेल्वे गाड्यांना अतिरिक्त कोच जोडावेत, अशी विनंती विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्राद्वारे केली आहे.
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या लाखो अनुयायांमुळे या काळात मुंबईतील रेल्वे सेवांवर प्रचंड ताण येतो. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांमध्ये वाढ करणे आणि आवश्यक ते अतिरिक्त कोच जोडणे अत्यावश्यक असल्याचे बनसोडे यांनी पत्रात नमूद केले आहे.
बनसोडे यांनी पुढे म्हटले आहे की, देशभरातील अनुयायी महापरिनिर्वाण दिनाच्या काही दिवस आधीच मुंबईत दाखल झाले, तर स्थानिक रेल्वे सेवांवरील ताण कमी होईल आणि प्रवासात गैरसोय टळेल. तसेच, महापरिनिर्वाण दिनानंतर हे अनुयायी सुरक्षित आणि सुलभपणे आपल्या गावी परतू शकतील
.#DrBabasahebAmbedkar #MahaparinirvanDiwas #AnnaBansode #RailwayMinister #AshwiniVaishnaw #Mumbai #RailwayServices #Followers #BharatRatna #MimTimes #NewsUpdate









