top of page

दादर: अशोकस्तंभ ते चैत्यभूमी व इंदूमिल पर्यंत मार्ग सुकर होणार समुद्रालगत जमीन महसूल विभागाकडून लवकर बृहन्मुंबईकडे हस्तांतरण करा : उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

  • Writer: MimTimes मिम टाइम्स  م ٹائمز
    MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
  • Oct 16
  • 1 min read
ree

16 October 2025


मुंबई,दादर येथील अशोकस्तंभ ते चैत्यभूमी मार्गातून इंदूमिल पर्यंत समुद्रालगत रस्ता तयार करण्यासाठी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी महसूल विभागाला सूचना दिल्या आहेत की ही जमीन लवकरात लवकर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित करावी. यासाठी पर्यावरण विभागासह इतर आवश्यक परवानग्या मिळवाव्यात.


उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या दालनात घेतलेल्या आढावा बैठकीत महसूल विभाग आणि मुंबई महापालिकेला हे निर्देश देण्यात आले.


उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले की इंदूमिल, चैत्यभूमी आणि अशोक स्तंभ ही केवळ स्मारके नाहीत, तर बौद्ध समाज व बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ओळख जगासमोर मांडणारी ऐतिहासिक स्थळे आहेत. अशोकस्तंभ ते चैत्यभूमी व इंदूमिल पर्यंत समुद्राकडील रस्ता तयार झाल्यास लाखो अनुयायांना याचा फायदा होईल.


बैठकीत चर्चेत आले की अशोकस्तंभ ते चैत्यभूमी मुख्य स्तूपानंतर इंदूमिल पर्यंतची जमीन बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित करावी आणि चैत्यभूमी ते (उत्तर विभाग/जी विभाग) इंदूमिल पर्यंत रस्ता तयार करून परिसर सुशोभित करावा. महसूल विभाग, पर्यावरण विभाग, महापालिका प्रशासन आणि MMRDA यांनी रस्त्याच्या उभारणीस तत्काळ कार्यवाही करण्याची तयारी दर्शविली.


बैठकीसाठी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, पर्यावरण सचिव जयश्री भोज, संचालक डॉ. अ.म. पिंपरकर, इंदूमिल आर्किटेक्ट शशी प्रभू, नागसेन कांबळे, डॉ. भंदत राहूल बोधी व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



bottom of page