top of page

दादासाहेब फाळके चित्रनगरीत सुशासन सप्ताहाचे आयोजन

  • Writer: MimTimes मिम टाइम्स  م ٹائمز
    MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
  • Oct 21, 2024
  • 1 min read
ree

21 October 2024

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ अर्थात दादासाहेब फाळके चित्रनगरीत सुशासन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सप्ताह २२ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू होणार असून २९ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. यामध्ये प्रशासन, माहिती अधिकार, आर्थिक विषय आणि ई-गव्हर्नन्स यावर विविध मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.

सप्ताहाचे उद्घाटन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्या हस्ते २२ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. यावेळी त्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुशासनाविषयी मार्गदर्शन करणार आहेत.

आठवडाभरात अन्य विषयांवरही तज्ञांच्या मार्गदर्शन सत्रांचे आयोजन केले आहे. यामध्ये प्रशासनातील कार्यपद्धती, माहिती अधिकार अधिनियम २००५, आर्थिक आणि खरेदी अधिकार, अभिलेख व्यवस्थापन, व्यक्तिमत्व विकास, आणि ई-गव्हर्नन्स या महत्वाच्या विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत.

महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी महामंडळातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना या सत्रांमध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

bottom of page