नीलम गोऱ्हे यांनी मातोश्रीची काळी बाजू उजेडात आणल्याने बीएमसी 'टक्कापुरुष' उद्धव ठाकरेंना बसला धक्का:ज्योती वाघमारे
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
- Feb 24
- 1 min read

24 February 2025
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणाऱ्या वक्तव्यामुळे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुन्हा एकदा चर्चेत झळकल्या आहेत. मातोश्रीच्या काळ्या बाजूचा पर्दाफाश केल्यामुळे बीएमसीमधील 'टक्कापुरुष' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.
डॉ. ज्योती वाघमारेज्योती वाघमारे यांनी देखील यावेळी उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. त्यांनी ठाकरे कुटुंबाच्या आर्थिक व्यवहारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कठोर शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली.
• बीएमसीच्या टक्क्यांमधून आलेली लक्झरी: डॉ. गोऱ्हे यांनी आरोप केला की, फक्त मर्सिडिज गाड्याच नव्हे तर आदित्य ठाकरेंच्या बाबागाडीसुद्धा बीएमसीच्या टक्क्यांमधून आलेली आहे.
• मातोश्री-2 आणि रेशमी साड्या: जुने कार्यकर्ते सांगतात की, मातोश्री-2 ची उभारणी आणि महागड्या रेशमी साड्या खंडणीच्या पैशातून घेतल्या गेल्या. यावर अद्याप कोणतीही स्पष्टीकरण आलेले नाही.
• लंडनमधील प्रॉपर्टींचा गूढ: महाराष्ट्रात ऊन वाढले की, गुलाबी थंडीची मजा घेण्यासाठी लंडनला जाणाऱ्या ठाकरे कुटुंबाच्या प्रॉपर्टींबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
• आदित्य ठाकरेंची मालमत्ता: वयाच्या तिशीत कोणतीही नोकरी किंवा उद्योग न करता आदित्य ठाकरेंकडे करोडोची मालमत्ता कशी आली याबद्दल जनतेला उत्तर मिळालेले नाही.
राणे साहेबांनी ठाकरे कुटुंबावर टीका करताना त्यांना 'लेना' बँक म्हणले, तर राज ठाकरे यांनी 'खोके' नव्हे तर 'कंटेनर' लागतात असा घणाघात केला.
ठाकरे कुटुंबाकडे असलेल्या महागड्या परदेशी गाड्या कोणाच्या नावावर आहेत यावरही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. तसेच, थिएटरच्या बाहेर सिनेमाच्या तिकिटांची दलाली उबाठा मध्ये चालते असा आरोपही करण्यात आला आहे.
या सर्व गंभीर आरोपांवर ठाकरे कुटुंबाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात यामुळे नव्या चर्चा आणि वादळ उठण्याची शक्यता आहे.
- Mim Times