पद्म पुरस्कार 2025: महाराष्ट्राला एकूण 14 पुरस्कारांचा सन्मान
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز

- Jan 26
- 1 min read

26 January 2025
नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने देशातील सर्वोच्च नागरी सन्मान पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यंदा महाराष्ट्रातील 14 मान्यवरांना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांना मरणोत्तर पद्मभूषण, तसेच ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

याशिवाय, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 11 मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
कला, साहित्य, पर्यावरण, वैद्यकीय, उद्योग, कृषी यांसारख्या क्षेत्रांत महाराष्ट्रातील खालील मान्यवरांचा समावेश करण्यात आला आहे:
• अच्युत पालव – सुलेखन क्षेत्रात योगदान.
• अशोक सराफ – मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते.
• अश्विनी भिडे देशपांडे – शास्त्रीय गायिका.
• जस्पिंदर नरुला – प्रसिद्ध पार्श्वगायिका.
• राणेंद्र (रोणू) भानू मजुमदार – ज्येष्ठ बासरीवादक.
• वासुदेव कामत – ज्येष्ठ चित्रकार.
• अरुंधती भट्टाचार्य – माजी एसबीआय अध्यक्षा.
• चैत्राम पवार – पर्यावरण आणि वनसंवर्धनातील कार्य.
• मारुती चितमपल्ली – अरण्यऋषी आणि वन्यजीव अभ्यासक.
• सुभाष शर्मा – कृषी क्षेत्रातील भरीव योगदान.
• डॉ. विलास डांगरे – वैद्यकीय क्षेत्रात गरीब रुग्णांसाठी सेवा.
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मरणोत्तर सन्मानाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण अभिवादन केले. त्याचप्रमाणे, गायक पंकज उधास यांच्या गझल क्षेत्रातील योगदानाचाही गौरव केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पद्म पुरस्कारार्थींचे अभिनंदन करताना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा गौरव असल्याचे म्हटले. त्यांनी अरण्यऋषी मारुती चितमपल्ली व वनसंवर्धक चैत्राम पवार यांच्या निसर्ग सेवेला विशेष दाद दिली.
या पुरस्कारांमुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, शैक्षणिक, पर्यावरणीय, आणि वैद्यकीय क्षेत्राचा सन्मान वाढला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदाचे पद्म पुरस्कार महाराष्ट्राच्या प्रगतीचा ठसा असल्याचे मत व्यक्त केले.









