पहलगाम दहशतवादी हल्ल्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून मूक आंदोलन महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर काळ्या फिती लावून निषेध
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
- Apr 24
- 1 min read

24 April 2025
मुंबई,काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर मूक आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हाताला काळ्या फिती बांधून शांततेच्या मार्गाने विरोध दर्शविला.
या मूक आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केले. या वेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, आमदार सुनिल शेळके, शिवाजीराव गर्जे, इद्रीस नायकवडी, पंकज भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.
याशिवाय पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, सरचिटणीस लतिफ तांबोळी, उपाध्यक्षा राजलक्ष्मी भोसले, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, माजी आमदार जयंत जाधव, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसने या निमित्ताने केंद्र सरकारकडून ठोस कारवाईची मागणी करत, देशातील सुरक्षेच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.