top of page

महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी भेट अनुयायांसाठी प्रेरणादायी ठरेल... उपराष्ट्रपतींना विधानसभा उपाध्यक्षांचे निमंत्रण पत्र...

  • Writer: MimTimes मिम टाइम्स  م ٹائمز
    MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
  • 3 days ago
  • 1 min read
ree

13 November 2025


मुंबई (मिम टाइम्स) येत्या ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमासाठी उपराष्ट्रपती  सी.पी. राधाकृष्णन यांना आमंत्रित करण्यात आले आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी उपराष्ट्रपती यांना पत्र पाठवत निमंत्रण दिले आहे.


       उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी पत्रात म्हटले आहे की, “भारतरत्न


डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार आणि सामाजिक न्यायाचे समर्थक आहेत. समानता आणि सक्षमीकरणाच्या दिशेने राष्ट्राच्या मार्गाला त्यांनी आकार दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी लाखो अनुयायी दादर येथील चैत्यभूमीवर येत असतात. देशभरातील लाखो लोक श्रद्धा आणि कृतज्ञतेने त्यांना स्मरतात.”


महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर आपली उपस्थिती  डॉ. आंबेडकरांच्या कार्याचा सन्मान ठरेलच, तसेच त्यांच्या विचारांचे अनुयायींना प्रेरणा व नवचैतन्य देणारी ठरेल, असेही विधानसभा उपाध्यक्षांनी नमूद केले आहे.


      विधानसभा उपाध्यक्षांनी पाठविलेल्या पत्रात उपराष्ट्रपतींच्या अनुकरणीय सार्वजनिक सेवेचे आणि देशाच्या लोकशाही मूल्यांप्रती असलेल्या वचनबद्धतेचे कौतुक करत, त्यांच्या निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन व्यक्त केले आहे.


bottom of page