top of page

माजी आमदार संदीप नाईक यांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश, बेलापूरमधून आमदारकीसाठी सज्ज

  • Writer: MimTimes मिम टाइम्स  م ٹائمز
    MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
  • Oct 22, 2024
  • 1 min read

22 October 2024


मुंबई,भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार संदीप नाईक यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (शरद पवार) पक्षात प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. जयंत पाटील यांनी संदीप नाईक यांचे पक्षात स्वागत करताना बेलापूरच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.



जयंत पाटील यांनी सांगितले की, “शहरात अनेक प्रश्न आहेत, जसे की १२.५% भूखंडाचे काम अर्धवट राहिले आहे, झोपडपट्टी पुनर्वसन प्रलंबित आहे, आणि सिडकोकडे इमारतींचे मालकी हक्क मिळवण्याचे आव्हान आहे. या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपण प्रयत्न करू.”

bottom of page