top of page

माजी खासदार राहुल शेवाळे यांचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी कुटुंबांशी संवाद

  • Writer: MimTimes मिम टाइम्स  م ٹائمز
    MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
  • Sep 10, 2024
  • 1 min read


माजी खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कुटुंब भेट अभियान'ाला घाटला, चेंबूर येथून सुरुवात केली. या अभियाना अंतर्गत, त्यांनी लाभार्थी कुटुंबांना भेट दिली आणि त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी घरांमध्ये विराजमान गणरायाचे दर्शन घेतले व 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना'सह 'लेक लाडकी योजना', 'वयोश्री योजना' अशा शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी संबंधित कुटुंबांना केले.


राज्यातील महिलांना दरमहा दीड हजार रुपयांची आर्थिक मदत करणारी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरत असून, या योजनेतून महिलांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होत आहे.

bottom of page