top of page

मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती जाहीर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली २१ जणांची टीम कार्यरत

  • Writer: MimTimes मिम टाइम्स  م ٹائمز
    MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
  • 3 days ago
  • 1 min read
ree

10 September 2025


मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांचा विचार करून शिवसेनेने पक्षाची मुख्य कार्यकारी समिती जाहीर केली आहे. या समितीमध्ये पक्षाचे मुख्य नेते, खासदार, माजी खासदार, आमदार आणि माजी आमदार यांचा समावेश असून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकूण २१ जणांची ही समिती कार्यरत राहणार आहे.


या समितीतून महापालिका निवडणुकीशी संबंधित सर्व महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. पक्षाची निवडणूक रणनीती, उमेदवार निवड, प्रचार मोहिमा यासारख्या बाबींचे नियोजन ही समिती करणार आहे. शिवसेना महिला नेत्या मीनाताई कांबळी यांना देखील यात स्थान देण्यात आले असून महिला आघाडी मजबूत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जातो.


शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती पुढीलप्रमाणे :


• एकनाथ शिंदे – मुख्य नेते


• रामदास कदम – नेते


• गजानन कीर्तीकर – नेते


• आनंदराव अडसूळ – नेते


• मीनाताई कांबळे – नेत्या


• डॉ. श्रीकांत शिंदे – खासदार


• रवींद्र वायकर – खासदार


• मिलिंद देवरा – राज्यसभा खासदार


• राहुल शेवाळे – माजी खासदार


• संजय निरुपम – माजी खासदार


• प्रकाश सुर्वे – आमदार


• अशोक पाटील – आमदार


• मुरजी पटेल – आमदार


• दिलीप लांडे – आमदार


• तुकाराम काते – आमदार


• मंगेश कुडाळकर – आमदार


• मनिषा कायंदे – विधान परिषद आमदार


• सदा सरवणकर – माजी आमदार


• यामिनी जाधव – माजी आमदार


• दीपक सावंत – माजी आमदार


• शिशिर शिंदे – माजी आमदार


या समितीच्या जाहीरनाम्यामुळे महापालिका निवडणुकीतील शिवसेनेची तयारी आणखी गतीमान होणार असून, पक्षात नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.



bottom of page