top of page

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिंदे गटाची मोठी घोषणा प्रभारी विभाग प्रमुख व प्रभारी विधानसभा प्रमुखांची यादी जाहीर

  • Writer: MimTimes मिम टाइम्स  م ٹائمز
    MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
  • Sep 7
  • 1 min read
ree

7 September 2025


मुंबई :हिंदूहृदयसम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री मा.ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रभारी विभाग प्रमुख आणि प्रभारी विधानसभा प्रमुखांची यादी जाहीर करण्यात आली आहे.


मुंबईतील विविध विभाग आणि विधानसभा क्षेत्रांसाठी नवे जबाबदार नेमण्यात आले असून या नेमणुकीमुळे शिंदे गटाची संघटनात्मक तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.


प्रभारी विभाग प्रमुखांमध्ये


भांडुपचे श्री. अशोक पाटील, मुलुंडचे श्री. जगदीश शेट्टी, विक्रोळीचे श्री. दत्ता दळवी, घाटकोपर पश्चिमचे श्री. बाबा हांडे, घाटकोपर पूर्वचे श्री. सुरेश आवळे व श्री. अख्तर कुरेशी, मानखुर्द-शिवाजी नगरचे श्री. अजित भंडारी, मालाड पश्चिमचे श्री. राम यादव, बोरिवली-दहिसरचे श्री. सचिन म्हात्रे, मागाठाण्याचे श्री. मनोहर देसाई, अंधेरी पश्चिमचे श्री. राजू पेडणेकर, वसोवाचे श्री. अल्ताफ पेवेकर, दिंडोशीचे श्री. वैभव भरडकर, गोरेगावचे श्री. स्वप्नील टेंबवलकर, अंधेरी पूर्वचे श्री. मुरजी पटेल, जोगेश्वरी पूर्वचे श्री. ज्ञानेश्वर सावंत, वांद्रे पश्चिम-पूर्व व विमानतळ विभागाचे श्री. कुणाल सरमळकर, चांदिवलीचे श्री. दिलीप लांडे, कलिनाचे श्री. महेश पेडणेकर, कुर्ल्याचे श्री. विनोद कांबळे, कुलाबाचे श्री. गणेश सानप, मलबार हिलचे श्री. प्रवीण कोकाटे, मुंबादेवीचे श्री. रुपेश पाटील, भायखळ्याचे श्री. विजय लिपारे, वरळीचे श्री. दत्ता नरवणकर व श्री. नाना आंबोले, शिवडीचे श्री. अविनाश राणे, अणुशक्ती नगरचे श्री. तुकाराम काते, चबुरचे श्री. मंगेश सातमकर, सायन-कोळीवाड्याचे श्री. भास्कर शेट्टी, धारावीचे श्री. भाई परब, माहीमचे श्री. सुनील मोरे अशी नावे जाहीर झाली आहेत.

ree

प्रभारी विधानसभा प्रमुखांमध्ये


दिंडोशी आणि गोरेगावसाठी श्री. गणेश शिंदे, विलेपार्लेसाठी श्री. जितू जनावडे, वांद्रे पश्चिमसाठी श्री. विलास चावरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


ही यादी शिवसेना सचिव संजय भाऊराव मोरे यांनी अधिकृतरीत्या प्रसिद्ध केली आहे.


नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.



bottom of page