मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेत लोकसभा प्रमुखांची नियुक्ती
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
- 32 minutes ago
- 1 min read

12 September 2025
मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीला काही महिन्यांचा अवधी असताना शिवसेना (शिंदे गट) ने संघटनात्मक पातळीवर जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील विविध लोकसभांसाठी प्रभारी लोकसभा प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेनेचे संस्थापक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार या नियुक्त्या अधिकृतपणे जाहीर झाल्या आहेत.
या नियुक्त्यांनुसार—
• मुंबई उत्तर लोकसभा – आमदार प्रकाश सुर्वे
• मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा – खासदार रविंद्र वायकर
• मुंबई ईशान्य लोकसभा – उपनेते शिशिर शिंदे (मुलुंड, भांडूप पश्चिम) व उपनेते दत्ता दळवी (विक्रोळी, घाटकोपर पूर्व-पश्चिम, मानखुर्द-शिवाजीनगर)
• मुंबई उत्तर मध्य लोकसभा – डॉ. दीपक सावंत (उपनेते)
• मुंबई दक्षिण मध्य लोकसभा – उपनेते राहुल शेवाळे
• मुंबई दक्षिण लोकसभा – खासदार मिलिंद देवरा
शिवसेना सचिव संजय मोरे यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या नियुक्त्यांमुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत होईल. स्थानिक पातळीवर जनतेपर्यंत पोहोचून निवडणुकीत चांगले यश मिळविण्यासाठी ही जबाबदारी पदाधिकाऱ्यांनी प्रभावीपणे पार पाडावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.