लालबाग ब्रिजवर BMC कचरा गाडीचा अपघात – जीवितहानी नाही, काही वेळात ट्रॅफिक सुरळीत
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
- 4 minutes ago
- 1 min read

5 May 2025
मुंबई, आज सकाळी लालबाग ब्रिजवर बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) च्या कचरा वाहून नेणाऱ्या गाडीचा अपघात झाला. गाडीचा ब्रेक फेल झाल्यामुळे ती थेट पुलाच्या कठड्याला जाऊन धडकली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
See video
अपघातानंतर गाडीतील ऑईल रस्त्यावर सांडले, ज्यामुळे पुलावरील रस्ता घसरट झाला. लालबाग ब्रिज हा एकाच मार्गाने वाहतूक होणारा पूल असल्यामुळे पर्यायी मार्ग उपलब्ध नव्हता, आणि त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
परंतु, ट्रॅफिक पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत वाहतूक नियमनाचे उत्तम काम केले. त्यांनी रस्त्यावर वाळू टाकून घसरटपणा कमी केला आणि गाडी बाजूला करण्यात आली. काही वेळातच वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.
स्थानिकांनीही पोलिसांना मदत केली. अपघाताबाबत अधिक तपास सुरू असून, यंत्रणेकडून वाहनाची तांत्रिक तपासणी करण्यात येत आहे.