top of page

विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती; पहिल्या मराठी व्यक्तीला केंद्रीय राज्यमंत्री पदाचा दर्जा

  • Writer: MimTimes मिम टाइम्स  م ٹائمز
    MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
  • Oct 19, 2024
  • 1 min read

नवी दिल्ली 19 October,भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि राजस्थानच्या सहप्रभारी विजया रहाटकर यांची प्रतिष्ठित राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विजया रहाटकर या आयोगाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या पहिल्या मराठी महिला ठरल्या असून, त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाला आहे.



विजया रहाटकर यांनी यापूर्वी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्याकडून महिलांच्या हक्कांसाठी घटनात्मक आणि कायदेशीर मुद्द्यांवर काम केले जाईल, तसेच महिलांच्या उन्नतीसाठी केंद्र व राज्य सरकारांना सल्ला दिला जाईल.

bottom of page