top of page

संजय राऊतविरोधात शिवसेना महिला आघाडीचे ‘जोडे मारा’ आंदोलन

  • Writer: MimTimes मिम टाइम्स  م ٹائمز
    MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
  • Feb 27
  • 1 min read

27 February 2025


मुंबई ,विधानपरिषद उपसभापती आणि शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात अवमानजनक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ शिवसेना महिला आघाडीने उबाठा खासदार संजय राऊतविरोधात आज ‘जोडे मारा’ आंदोलन केले. आमदार मंगेशजी कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महिला विभाग प्रमुख शालिनी सुर्वे यांच्या उपस्थितीत हे आंदोलन पार पडले.

शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब भवन येथे महिलांनी संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. संतप्त महिलांनी राऊत यांच्या फोटोला जोडे मारून आपला रोष व्यक्त केला.

See video

या आंदोलनादरम्यान शिवसेना उपनेत्या शीतल म्हात्रे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. "संजय राऊत यांनी यापूर्वी स्वप्ना पाटकर, कंगना राणावत आणि नवनीत राणा यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्ये केली आहेत. राजकारणात टीका करताना शब्दांचा वापर नीट करावा. नाहीतर आज आम्ही केवळ बॅनरवर जोडे मारले आहेत, पण पुढच्या वेळी तुमच्या तोंडात चप्पल मारल्याशिवाय बाळासाहेबांच्या रणरागिणी शांत बसणार नाहीत," असा तीव्र इशारा त्यांनी दिला.

या आंदोलनामुळे शिवसेना महिला आघाडीचा आक्रमक पवित्रा स्पष्ट झाला असून संजय राऊत यांच्या विधानांवरुन राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

bottom of page