स्वप्नाक्षय मित्र मंडळाला ‘बृहन्मुंबई महानगरपालिका 2025 श्री गणेश पुरस्कार’ प्रथम पारितोषिक
- MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
- 2 days ago
- 1 min read

11 October 2025
मुंबई,अंधेरी (पश्चिम): मॉडेल टाउनमधील स्वप्नाक्षय मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सादरीकरण, शिस्तबद्ध आयोजन आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या कार्याची दखल घेत बृहन्मुंबई महानगरपालिकाने स्वप्नाक्षय मित्र मंडळाला “श्री गणेश पुरस्कार 2025” चे प्रथम पारितोषिक जाहीर केले आहे.

या पुरस्कारात मंडळाला ₹75,000 रोख रक्कम आणि प्रथम पारितोषिकाची ट्रॉफी देण्यात आली. हा सन्मान अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी, उपायुक्त प्रशांत सपकाळे आणि उपायुक्त चंदा जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी के-पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. चक्रपाणी अल्ले यांनी मंडळाच्या उपक्रमांचे आणि गणेशोत्सवातील नियोजनाचे विशेष कौतुक केले.

मंडळाचे कार्याध्यक्ष देवेंद्र (बाळा) आंबेरकर, अध्यक्ष राजेश ढेरे, उपकार्याध्यक्ष संजीव (कल्ले) बिल्लू, सरचिटणीस अशोक मोरे, सल्लागार अनिल राऊत, तसेच दिनेश गवलानी, विकी गुप्ता, सुरेश नागपाल, चेतना नायडू, अनिल मिश्रा, राजकुमार सिंग, दीपक बच्चे, जयंती गोहील, अंकुश पाटील आणि कलादिग्दर्शक सुमित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
मंडळाच्या या यशामुळे मॉडेल टाउन परिसरात आनंदाचे वातावरण असून, स्थानिक रहिवाशांनी या सन्मानाबद्दल मंडळाचे अभिनंदन केले आहे.
